केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार अपयशी - राधाकृष्ण विखे-पाटील. - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार अपयशी - राधाकृष्ण विखे-पाटील.

Share This
पुणे (प्रतिनिधी) - केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार अपयशी ठरल्यानेच दिल्लीची निवडणूक कौल भाजपच्या विरोधात गेला आहे. त्याचबरोबर राज्यातील भाजप सरकार पहिल्या १०० दिवसांतच सर्व पातळ्यांवर साफ अपयशी ठरले आहे. या सरकारला शिवसेना कधीही पाठिंबा काढून घेईल आणि सरकार पडेल अशी नेहमी भिती वाटत आहे. अशी घणाघाती टीका विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
विखे पाटील म्हणाले की भाजप सरकारला १०० दिवस पूर्ण झाले तरी काहीच ठोस कार्यक्रम हाती घेतला नाही. या सरकारचे अपयश दिल्लीच्या निकालावरुण स्पष्ट दिसत आहे. इंधनाचे कमी झालेले दर पहाता एस. टी. भाडेवाढ कशाला ? असा सवाल करत ते म्हणाले की भाजप सरकार केवळ घोषणाबाज आहे. 
काँग्रेसतर्फे भाजपच्या अपयशावर घोषनाबाज सरकारचे १०० दिवस असे परिपत्रक काढणार आहे. राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती असल्याने ७०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तरीही हे सरकार ढिम्मच आहे. 

मराठा आरक्षणाबाबतही सरकार उदासिनच आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. शेतीमालाचे भाव उतरले आहेत पण महागाई कमी नाही. राधाकृष्ण विखे-पाटील पुढे म्हणाले की लोकांच्या प्रश्नापासून हे सरकार खूप दुर गेले आहे. लोकांमध्ये भाजपने फसवणूक केल्याची भावना आहे. पुण्याने भाजपला सर्वाधिक आमदार आणि खासदार देउनही पुण्यासाठी सरकारने काहीच केलेले नाही. मुंबईमधील 3 मिल नागपुरला हलवून सरकार मिलच्या जमीना उद्योगपतींच्या घशात घालण्याचे प्रयत्न करत आहे.
सरकार अल्पसंख्यांकावर अत्याचार करत आहे. मुस्लिमांबाबत सरकार नकारात्मक विचार करीत आहे. सरकारने शेतकऱ्यांना ७ हजार रुपयांची आर्थिक मदत केली परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ ५०० ते ७०० रुपयेच जमा झाले आहेत.

सरकारने कापसाला ६ हजार रु भाव देण्याचे जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात ३५०० रुपये भाव दिला गेला. 
राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री आणि  कृषीमंत्री नाही. पुणे क्राईम कॅपीटल होत आहे. सरकारने एलबीटी आणि टोल बंद करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु दोन्हीकडे अद्याप वसूली सुरू आहे. व्हॅचवर २ टक्के सरचार्ज लागू केला तर ग्रामीण जनतेला या कराचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

राज्यात कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी व्यक्तिगत महत्वाकांक्षा बाजूला ठेवणं गरज असुन, विरोधी पक्ष म्हणून काम करताना दोन्ही पक्षांनी समन्वयानं काम करण्याची गरज आहे असं मत यावेळी त्यांनी केलं. 

काँग्रेस-राष्ट्रवादीतील २१ आजी-माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब यांनी केलाय... त्या दाव्यात तथ्य नसल्याचं विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलय... त्याउलट दानवे स्वतःच काँग्रेसमध्ये येण्याच्या मनस्थितीत होते, पण त्यावर आमच्याकडूनच काही निर्णय घेतला नाही, अशी माहिती त्यांनी दिलीय.

राज्य सरकारनं नदीच्या दोन किलोमीटर परिसरात उद्योगांना परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय... पण हा निर्णय बेकायदा असून त्याविरोधात काँग्रेसच्या वतीनं लवकरच कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलीय.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages