मरेच्या १५ डब्यांच्या प्लॅटफॉर्मवरील छत बांधण्यासाठी ५ कोटी खर्च येणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मरेच्या १५ डब्यांच्या प्लॅटफॉर्मवरील छत बांधण्यासाठी ५ कोटी खर्च येणार

Share This
मुंबई : उपनगरीय रेल्वेच्या मध्य रेल्वे प्रशासनाकडून विविध कामांसाठीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. यामध्ये सहा रेल्वे स्थानकांवर अर्धवट राहिलेल्या छतांचे काम पूर्ण करण्यासाठीच्या प्रस्तावाचा समावेश आहे. ज्या रेल्वे स्थानकांत १५ डबा लोकल थांबतात, त्या स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवरील छतांचे काम अर्धवट राहिले आहे. हे छत बांधण्यासाठी ५ कोटी ४ लाखांचा खर्च येणार आहे.
उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. या वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी ९ डब्यांच्या लोकल १२ डब्यांच्या आणि आता १५ डब्यांच्या चालवण्यावर रेल्वेकडून भर दिला जात आहे. यात मध्य आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या प्रत्येकी २-२ जलद लोकल धावत आहेत. साधारण दीड वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या या लोकल जलद मार्गावरून धावतात. १५ डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात आला. परंतु प्लॅटफॉर्मचा विस्तार करीत असताना छतांचे काम मात्र अर्धवटच करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागते. अर्धवट छतांचे काम पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे निधी नसल्याचे सांगण्यात आले होते. अखेर मध्य रेल्वेकडून काही कामांसाठी विविध प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. यामध्ये सहा रेल्वे स्थानकांवरील अर्धवट राहिलेले छतांचे काम पूर्ण करण्याचा प्रस्तावदेखील तयार करण्यात आला आहे. यासाठी ५ कोटी ४ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. सीएसटी, भायखळा, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड आणि डोंबिवली या स्थानकांवरील छतांचे क ाम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे या स्थानकांवरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages