मुंबई : शहरातील ६२ टक्के पालक आपल्या पाल्यांना मारझोड करत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती एका सर्वेक्षणाअंती उघडकीस आली आहे. मुलांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बहुतांश पालक मारहाण करतात. मात्र, त्यातून मुलांच्या मनावर होणारे परिणाम त्यांच्याकडून दुर्लक्षिले जात आहेत. २0१२ मध्येही ६९ टक्के पालकांनी मुलांना मारहाण करत असल्याची कबुली दिली होती. या सर्वेक्षणाने पालकांची मानसिकता बदलण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
मुंबई शहरातील १७00 पालकांना या सर्वेक्षणात सामील करून घेत त्यांची मते जाणून घेण्यात आली. मुलांना मारणार्या पित्यांच्या तुलनेत मातांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलांना मारझोड करत असल्याची कबुली देणार्या या पालकांत २९ टक्के पिता तर ६१ टक्के मातांचा समावेश आहे. 'बोर्नस्मार्ट' या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून हे धक्कादायक वास्तव प्रकाशझोतात आले आहे. सोशल नेटवर्किंग साईट्स तसेच अन्य माध्यमांच्या प्रभावामुळे मुले नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहेत. त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी मारहाण करावी लागते, असे म्हणणे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पालकांनी मांडले.
मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी त्यांच्यावर हात उगारणे, यात काही गैर वाटत नसल्याचेही काही पालकांनी म्हटले. विशेष म्हणजे, पालकांनी स्वत:देखील लहान असताना आईवडिलांकडून मार खाल्ला आहे. त्यामुळे याच पालकांनी आपल्या मुलांना मारण्याची प्रथा सुरू ठेवली आहे, असे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदवले. २ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांना पालकांकडून अधिक मारहाण होते तर ८ ते १0 वर्षे वयोगटातील मुलांना ताळ्यावर आणण्यासाठी पॉकेटमनी बंद करण्याचीही तंबी दिली जाते. तसेच काहींना आश्रमशाळेत पाठवण्याची धमकी दिली जाते, असेही या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.