मोबाइल तिकीट होणार अधिक सोपे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोबाइल तिकीट होणार अधिक सोपे

Share This

मुंबई : उपनगरीय रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या वेळेत बचत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोबाइल तिकीट सुरू केले आहे; परंतु प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मोबाइल तिकिटाला मिळाला नाही. तो मिळावा यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून आणखी नवे तंत्रज्ञान आणण्यात येणार आहे. सध्या मोबाइलवर तिकीट बुक केल्यानंतरही एटीव्हीएम मशीनवर जाऊन पुन्हा पासवर्डची जुळवाजुळव करण्यात प्रवाशांचा वेळ वाया जातो. त्यामुळे यापुढे स्टेशनातील स्कॅनरवर मोबाइल ठेवताच तिकीट प्राप्त होण्याचे तंत्रज्ञान येणार आहे. त्यामुळे वन टाइम पासवर्डच्या झंझटीतून सुटका होणार आहे.
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मोबाइल तिकीट योजनेचा शुभारंभ २७ डिसेंबर २0१४ रोजी करण्यात आला होता. या योजनेत २८ जानेवारीपर्यंतच्या एका महिन्यात १0७८ तिकिटांची विक्री झाली तर १२७२ प्रवाशांनी प्रवास केला. या एका महिन्यात १८,४३0 रुपयांचे उत्पन्न मध्य रेल्वेला मिळाले आहे. ४९,१00 जणांनी आर वॉलेट रिचार्ज केले आहे. सध्या मध्य रेल्वेच्या २0 स्थानकांवर ही सेवा लागू करण्यात आली आहे. 

रेल्वे मंत्रालय सुरुवातीलाच सर्व स्थानकावर स्कॅनर बसवून मोबाइलवरील बारकोड स्कॅन केल्यास तिकिटाची प्रिंट देण्याची योजना आणणार आहे. मात्र, ज्या कंपनीला हे कंत्राट दिले होते, तिला सॉफ्टवेअर विकसित करण्यास उशीर झाल्याने क्रिसने आर वॉलेट ही एटीव्हीएमशी संलग्न असणारी प्रणाली प्रथम बाजारात उतरवल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. आता रेल्वे स्थानकांवर स्कॅनर बसवण्याच्या योजनेचे कंत्राट एका नव्या कंपनीला देण्यात आले असून मार्च २0१५ पर्यंत रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाइल रेल्वे स्थानरातील स्कॅनरवर ठेवताच तिकीट उपलब्ध करण्याची योजना कार्यान्वित होणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages