शिवाजी महाराजाच्या स्मारकाबाबत राज्यसरकारचं अपयश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिवाजी महाराजाच्या स्मारकाबाबत राज्यसरकारचं अपयश

Share This
मुंबई (प्रतिनिधी) - अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रस्तावित स्मारकाबाबत आवष्यक परवानग्या मिळाल्या तरच आपण भूमिपुजनाला येउ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसरकारला सांगण हे राज्यसरकारचं अपयश आहे.तसच अंतीम परवानग्या देणं हे पंतप्रधानांच्या हातात असताना त्यांनी ती वेळेत न देणं हा महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा अनादर होय. भूमिपुजनाची शिवजयंतीचा मुहूर्त टाळणं यामागेसुद्धा सेना भाजप मधला वाद कारणीभूत आहे अशी खरमरीत टिका विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 
हे राज्यसरकार फक्त घोषणाच करणारे सरकार आहे याचा पुन्हा एकदा प्रत्यय महाराष्ट्राच्या जनतेला आला आहे. हा शिवाजी महाराजांसारख़्या युगपुरुषाचा अवमान तर आहेच पण राज्यातील जनतेचाही अवमान करण्याचा प्रकार आहे. या स्मारकाचे उद्घाटन व काम सुरु करण्याबद्दल सरकारने ठोस भूमिका घेतली नाही तर याबाबत आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल.
असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यसरकार ला दिला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages