पालिका शाळेतील विद्यार्थ्याना पोषण आहार देण्यासाठी आर्थिक तर्दुत करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका शाळेतील विद्यार्थ्याना पोषण आहार देण्यासाठी आर्थिक तर्दुत करा

Share This
मुंबई / प्रतिनिधी - पालिका शाळेतील विद्यार्थ्याना चिक्की मिळालीच पाहिजे; विद्यार्थ्यांची गळती थांबवण्यासाठी चाइल्ड ट्र्याकिंग सॉफ्टवेअर सुरु करावे; शालेतुन निवृत्त होनाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्त होणाऱ्या महिन्यातच थकबाकी द्यावी अश्या मागण्या शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांनी शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये अर्थसंकल्पावरील भाषणात केल्या. 

मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाचा 2500 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाबाबत शिक्षण समितीच्या बैठकीत चर्चा सुरु आहे. यावेळी बोलताना विद्यार्थ्यांना चिक्की देण्याबाबत मागील वर्षी 84 कोटि रुपयांची तरतूद केली होती. या वर्षी कोणतीही तरतूद केली नसल्याने चिक्कीसाठी अर्थासंकल्पत तरतूद करावी. पलिका शाळेतील कर्मचार्याना निवृत्तिनंतर वर्षानुवर्षे त्यांची थकबाकी दिली जात नाही ही पद्धत त्वरित बदलावी आणि कर्मचारी निवृत्त होइल त्याच महिन्यात त्याला निवृत्ति वेतनाचा चेक दयावा अशी मागणी शेलार यांनी यावेळी केली.

शाळेमधील विद्यार्थ्यांची गळती थांबवावी म्हणून विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध असेल असे सॉफ्टवेअर सुरु करावे. पालिकेचे राज्य सरकारकड़े 1900 कोटी रूपये शाळांच्या अनुदानाचे पडून आहेत हा पैसा त्वरित वसूल करावा यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. शिक्षण विभाग आर्थिक तरतूद करत असला तरी अधिकारी फायली मंजूर करत नसल्याने निधी फुकट जात असतो असे प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा देत अधिकाऱ्यांनी चांगले काम करावे असे निर्देश शेलार यांनी दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages