मुंबई - संस्कृती रक्षणाच्या नावाखाली गुंडगिरीच्या घटना सातत्याने वाढत असून, महाराष्ट्र सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.
नागपूर येथे दि. 13 फेब्रुवारी 2015 रोजी दुपारच्या सुमारास घडलेल्या घटनांसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी नारेबाजी करीत मुलींची छेडखानी करणारे हे गुंड शिवसेनेशी संबंधित असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जबरदस्तीने तरूणींचे फोटो काढणे, त्यांना धमकावणे, मारहाण करणे हे प्रकार विनयभंग असून, ते कदापि खपवून घेतले जाऊ शकत नाहीत.
केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्ता आल्यापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या विचारधारेशी जुळलेल्या संघटनांचा उन्माद नियंत्रणाबाहेर गेला आहे. संस्कृतीरक्षणाच्या नावाखाली खुलेआम कायदा हातात घेऊन झुंडशाही करणा-यांना दोन्ही ठिकाणी जणू आपलेच सरकार आल्यासारखे वाटते आहे. या संघटना सत्ताधारी पक्षांच्या विचारधारांशी जुळलेल्या असल्या तरी राज्य सरकारने नि:पक्षपणे या प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज माणिकराव ठाकरे यांनी विषद केली आहे