डॉ. आंबेडकरांचे लंडनस्थित निवासस्थान खरेदी करण्याचा मार्ग मोकळा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. आंबेडकरांचे लंडनस्थित निवासस्थान खरेदी करण्याचा मार्ग मोकळा

Share This
14 एप्रिल पूर्वी खरेदी प्रक्रिया होणार पूर्ण- सामजिक न्याय मंत्री 
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनस्थित किंग्ज हेन्सी रोड येथील निवासस्थान खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर वास्तून खरेदी करून ते आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना केंद्रीय मंत्र्यांनी तातडीने प्रतिसाद दिल्यामुळे येत्या 14 एप्रिल पूर्वी सदर वास्तू खरेदीच्या प्रक्रिया पूर्ण होतील, असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज व्यक्त केला. खरेदी प्रक्रियेबाबत सकारात्मक घटनाक्रम घडल्यानंतर पत्रकारांना यासंबंधिची माहिती देण्यासाठी त्यांनी आपल्या दालनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

नऊ आणि दहा तारखेला या विषयांसंबंधी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी तसेच केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. लंडन येथील वास्तू खरेदी करण्याची तसेच तिच्या जतन व देखभालीसाठी लागणारा वार्षिक 61 लाख रूपयांचा खर्च करण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे केंद्रीय मंत्र्यांना सांगितले. त्यावर केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव आणि लंडन येथील भारतीय उच्चायुक्तांची चर्चा घडवून आणल्याचे बडोले म्हणाले. 

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री स्वराज यांच्यासोबत झालेल्या बैठकीत लंडन येथील वास्तु खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी लंडन येथील उच्चायुक्त कार्यालयात स्वंतत्र नोडल ऑफिसर नेमण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बडोले यांनी सांगितले. 

वास्तूची किंमत, टायटल क्लिअरंस तपासून राज्य सरकारला कळवणे, दोन देशांतील वास्तू खरेदी कायदेविषयक मार्गदर्शन करणे,  मे. सेडॉन या सॉलिसिटर संस्थेची अधिकृतता तपासून पुढील कार्यवाही करण्याबाबत राज्य सरकारला मार्गदर्शन करणे इत्यादी कामांची जबाबदारी स्वतंत्र नोडल ऑफिसरवर सोपवण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages