मरेच्या ७२ स्थानकांवर मिळणार मोबाइल तिकीट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मरेच्या ७२ स्थानकांवर मिळणार मोबाइल तिकीट

Share This
मुंबई : उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर तिकीट काढणार्‍या प्रवाशांची गर्दी कमी व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने मोबाइल तिकिटाची सुरुवात २७ डिसेंबर २0१४ पासून केली आहे. मोबाइल तिकिटाला आता प्रवाशांचा हळूहळू प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळेच मध्य रेल्वेच्या ७२ रेल्वे स्थानकांवर शुक्रवारपासून मोबाइल तिकीट सुरू करण्यात आले आहे. तर १५ फेब्रुवारीपासून भिवपुरी रोड स्थानकावरदेखील मोबाइल तिकीट मिळणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनादेखील मोबाइल तिकीट घेता येणार आहे.

दरदिवशी प्रवास करणार्‍या ७५ लाख प्रवाशांपैकी तिकीट काढणार्‍यांची संख्या पश्‍चिम रेल्वेवर ९ लाख, तर मध्य रेल्वेवर ११ लाख आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात तिकीट खिडक्यांवरून तिकीट काढणार्‍या प्रवाशांची रांगेपासून सुटका व्हावी, यासाठी रेल्वेने मोबाइल तिकिटाचा पयार्य स्वीकारला आहे. मोबाइल तिकिटाला प्रवाशांची पसंती मिळू लागली आहे. आता अनेक प्रवाशांनी आर वॉलेटदेखील बनवले आहे. मध्य रेल्वेने दादर, सीएसटी, ठाणे, कल्याण, वाशी, घाटकोपर, मुलुंड, कुर्ला, मशीद बंदर आणि डोंबिवली या स्थानकांवर ही सुविधा सर्वात प्रथम उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर ही सुविधा पनवेल, विक्रोळी, ऐरोली, बेलापूर, अंबरनाथ या स्थानकांवर देण्यात आली होती. आता शुक्रवारपासून एकूण ७२ रेल्वे स्थानकांवर मोबाइल तिकिटाची सेवा सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळेस तिकीट काढण्यासाठी जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागणार नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages