नवी दिल्ली : अलीकडे एटीएम वापरावर घालण्यात आलेले निर्बंध बंद होऊन अर्मयाद व्यवहाराची संधी पुन्हा उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नोव्हेंबर २0१४ पासून एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसीसहित अन्य बँकांनी एटीएम वापराची अर्मयाद सुविधा बंद केली होती; पण याला ग्राहकांचा विरोध वाढला आहे. त्यामुळे या पद्धतीची समीक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने इंडियन बँक्स असोसिएशन संस्थेला एटीएमच्या र्मयादित वापर करण्याच्या धोरणाची समीक्षा करण्यास बजावले आहे. आरबीआयच्याच निर्देशानुसार एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआयसारख्या बलाढय़ बँकांनी एटीएमवर पाचपेक्षा अधिक वेळा वापर केल्यास शुल्क लागू करण्यास सुरुवात केली होती. यानुसार प्रतिव्यवहार २0 रुपयांपर्यंत शुल्क वसूल केले जात आहे. दुसरीकडे पंजाब नॅशनलसारख्या काही बँका अशा प्रकारचे शुल्क वसूल करत नाहीत. यामुळे आरबीआय गोंधळात असून बँकांना सत्याची प्रचिती करण्यास सांगितले आहे. आरबीआयने १८ फेब्रुवारीपर्यंत समीक्षा अहवाल सादर करण्यास या संस्थेला सांगितले आहे. आरबीआयने १ नोव्हेंबर, २0१४ रोजी बँकांना एटीएम व्यवहारांवर शुल्क आकारण्याचे अधिकार दिले होते. या पश्चात वाढीव खर्चाचे कारण पुढे करत दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू या शहरांमध्ये दुसर्या बँकेच्या एटीएमचा वापर करण्यासाठी तीन मोफत व्यवहारांची र्मयादा निश्चित करण्यात आली होती, तर इतर छोट्या शहरांमध्ये पाच मोफत व्यवहारांची मुभा देण्यात आली होती. याच योजनेची समीक्षा करण्यास आयबीएला सांगण्यात आले आहे.