नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचार्यांच्या युनियन्सनी पगारवाढीच्या मागणीसाठी २५ फेब्रुवारीपासून चार दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सलग चार दिवस संप आणि पाचवा दिवस रविवार असल्याने बँक ग्राहकांना या संपाचा मोठा फटका बसणार आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे (यूएफबीयू) संयोजक एम. व्ही. मुरली यांनी सांगितले की, नोव्हेंबर २0१२ पासून बँका कर्मचार्यांच्या वेतनामध्ये १५ टक्के वाढ मानून काम करीत आहेत. अशा प्रकारे बँकांनी आधीपासूनच आपल्या खात्यांमध्ये १५ टक्के वाढ केली आहे, मात्र केवळ १३ टक्केच वाढ मिळत आहे. पंतप्रधान जन-धन योजना यशस्वी करण्यासह अनेक समस्या सोडवण्याचा प्रय▪बँक कर्मचारी करीत असतात. जन-धन योजनेच्या यशस्वितेबद्दल पंतप्रधानांनीही समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आम्ही संपाच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुरली यांनी सांगितले. नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्सचे सरचिटणीस अश्विनी राणा यांनी सांगितले की, बँक कर्मचारी युनियन्सनी सर्वसंमतीने २५ ते २८ फेब्रुवारीपर्यंत चार दिवसांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला इंडियन बँकअसोसिएशनने (आयबीए) १२.५ टक्केने वाढवून १३ टक्के केली आहे, मात्र युनियन्सनी १९ टक्के वाढीची मागणी केली आहे. ऑल इंडिया बँक एप्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी सांगितले की, मुख्य कामगार आयुक्तांच्या प्रस्तावावर आयबीएने २३ फेब्रुवारी रोजी यूएफबीयूबरोबर चर्चा करण्यास सहमती दर्शवली आहे.