मुंबईत सवाइन फ्लूच्या रुग्णामधे वाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत सवाइन फ्लूच्या रुग्णामधे वाढ

Share This
मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत आता पर्यंत 244 स्वाइन फ्लूचे रुग्ण आढ़लले आहेत. त्यापैकी 136 रुग्णांना उपचारा नंतर घरी पाठवले आहे. 45 रूग्ण ओप़ीडी मधे उपचार घेत असून 52 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 52 पैकी 34 रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यानी दिली.


स्वाइन फ्लू मुले अद्याप 11 जणांचा मृत्यु झाला आहे. त्या पैकी 10 मुंबई बाहेरचे आणी 1 मुंबई मधील असल्याचे देशमुख यानी सांगीतले. हाफ्किन आणि कस्तुर्भामधे नमूना तपासणी केली जाते. यासाठी 4 हजार रुपये घेतले जात होते आता पालिका रुग्णालयातील रुग्णांची तपासणी मोफत केली जाणार आहे. तसेच खाजगी रुग्णालयातील रुग्णाकडून तपासणीसाठी 2500 रुपये घेतले जाणार आहेत. 3 डॉकटराना याची लागन झाली असली तरी ती उपचारा दरम्यान झाली नसल्याचे देशमुख यांनी सांगीतले. मुंबई मधे अद्याप 13 हजार लोकांचे नमूने तपासले असता त्यापैकी 172 लोकाना याची लागन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खाजगी रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्यास रुग्णालय प्रशासनाने पालिकेकड़े सम्पर्क साधल्यास औषधे पुरवली जातील असे देशमुख यानीं सांगीतले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages