मुंबई : सध्या चालू स्थितीत असलेल्या एनटीसीच्या टाटा, पोदार आणि इंडिया यु. मिल.नं ५ या गिरण्या मुंबईत राहिल्या पाहिजेत, अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने केली आहे. या पार्श्वभूमीवर संघटेनेचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली २५ फेब्रुवारी रोजी परळ येथील कामगार मैदानावर सकाळी १0 वाजता लाक्षणिक साखळी उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे संयुक्त प्रतिनिधी मंडळ आणि कार्यकारिणीच्या सभेत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
एनटीसीच्या सध्या चालू स्थितीत असलेल्या गिरण्या विदर्भात हलवण्याच्या हालचाली सुरू आहे. कापसाचे उत्पादन होणार्या ठिकाणी या गिरण्या उभारल्यास फायद्याचे ठरेल, असे या मागील कारण आहे. यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामधून कामगार संघटनांना सोयीस्करपणे वगळण्यात आले आहे. मुंबईच्या नकाशावरून गिरणी उद्योग कायमचा हद्दपार करण्याचा सरकारचा हेतू स्पष्ट झाला आहे. कापूस पिकणार्या विदर्भात बंद अवस्थेत असलेल्या गिरण्या सरकार का चालू करत नाही. मुंबईतील गिरण्या बंद करून सुमारे ५ हजार कामगारांना रस्त्यावर आणायचे आणि तेथील बेरोजगारांना काम द्यायचे हा कोणता न्याय? असा सवाल उपोषणादरम्यान उपस्थित करण्यात येणार आहे.