मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने उपनगरीय प्रवासी वाहतूक, लांब पल्ल्याची वाहतूक आणि मालवाहतुकीमधून महसुलात मोठय़ा प्रमाणात वाढ केली आहे. सप्टेंबर २0१४ पर्यंत मध्य रेल्वेने महसुलामध्ये ४८५५.११ करोड रुपयांची वाढ केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ १८ टक्के आहे.
मध्य रेल्वे प्रशासनातर्फे उपनगरीय प्रवाशांची वाहतूक, लांब पल्ल्याच्या ट्रेनद्वारे प्रवाशांची वाहतूक, तर मालवाहतूकदेखील केली जाते. यामधून मरेला आर्थिक महसूल मिळतो. मध्य रेल्वेने यंदाच्या वर्षी महसुलामध्ये मोठी वाढ केली आहे. सप्टेंबर २0१४ पर्यंत मध्य रेल्वेला ४८५५.११ करोड रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षी मध्य रेल्वेला ४१२५.0८ करोड रुपये इतका महसूल मिळाला होता. मालवाहतुकीमधून यंदा मध्य रेल्वेने २३३५.३१ करोड रुपयांचा महसुल प्राप्त केला आहे. तर गेल्या वर्षी मालवाहतुकीमधुन २२५२.0८ करोडी रुपये इतका महसूल मिळाला होता. यंदाच्या वर्षी महसुलातील ही वाढ १८.८९ टक्के इतकी आहे.
