मुंबई, दि. 26 फेब्रुवारी 2015:यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प महाराष्ट्राची घोर निराशा करणारा असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी मोठा गाजावाजा करून सुरेश प्रभू यांना रेल्वे मंत्री पदाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे संपूर्ण देशाला त्यांच्याकडून मोठी अपेक्षा होती. त्यातही तब्बल 37 वर्षांनी महाराष्ट्राला रेल्वे खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने महाराष्ट्राला तर काहीशी अधिकच आशा होती. परंतु, त्यांनी सर्वांचाच अपेक्षाभंग केला आहे. आपल्या भाषणात त्यांनी खंडाळ्याच्या घाटाचा उल्लेख केला आणि प्रत्यक्षात महाराष्ट्राला कात्रजचा घाट दाखवला, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी भाडेवाढ केली नाही म्हणून केंद्र सरकार स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहे. परंतु, ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे. सत्तेत येताच मोदी सरकारने 2014 जूनमध्ये प्रवासी भाड्यात 14.2 टक्के तर मालवाहतुकीच्या दरात 6.2 टक्के वाढ केली होती. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेत 200 टक्क्यांहून अधिक राक्षसी स्वरूपाची भाडेवाढ झाली होती. त्यामुळे आता भाडेवाढ न केल्याचा त्यांचा दावा साफ खोटारडा आहे. उलटपक्षी मागील काही महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्याने कमी झाल्या. त्यामुळे रेल्वेचे हजारो कोटी रूपये वाचले आहेत. त्याचा कवडीचाही फायदा मोदी सरकारने सामान्य प्रवाशांना दिलेला नाही, असे ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातील पुणे-नाशिक, वर्धा-यवतमाळ-नांदेड, कल्याण-अहमदनगर, मनमाड-इंदूर, परळी, बडनेरा-वाशिम, गडचिरोली-मूलसह महाराष्ट्रातील अनेक रेल्वे मार्गांसंदर्भात विद्ममान रेल्वे मंत्री ठोस निर्णय घेतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्यांनी साधी नवीन रेल्वे गाड्यांची देखील घोषणा केलेली नाही. मुंबईसंदर्भात सुद्धा रेल्वे मंत्र्यांनी मोठी निराशा केली. एसी लोकल सुरू करण्याची प्रक्रिया काँग्रेस सरकारच्या काळातच सुरू झाली होती. एमयुटीपी-3 संदर्भात ओझरता उल्लेख रेल्वे मंत्र्यांनी केला पण् ठोस काहीच सांगितले नाही. रेल्वे फाटकांवर होणारे अपघात, सिग्नलमधील बिघाड आदी मुद्देसुद्धा दुर्लक्षित झाले. त्यामुळे या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच मिळालेले नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.
या अर्थसंकल्पात जुजबी घोषणा वगळता दुसरे काहीही नाही. अप्पर बर्थवर जाण्यासाठी शिडी, आरामदायक बर्थ, ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ, जादा चार्जिंग पॉईंटसारख्या लहान-लहान घोषणा करण्यात रेल्वे मंत्र्यांनी समाधान मानले. एकंदर या अर्थसंकल्पाचा आढावा घेतला तर श्री सुरेश प्रभू हे घोषणाबाज पंतप्रधानांचे घोषणाबाज रेल्वे मंत्री सिद्ध झाले आहेत. संपूर्ण देशाला विशेषत: महाराष्ट्राला यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात ‘प्रभुकृपा’ होईल, असे वाटले होते. परंतु, प्रत्यक्षात अवकृपाच झाल्याचे माणिकराव ठाकरे पुढे म्हणाले.