मुंबई दि 26- केद्रातील भाजपा आघाडी सरकारने सादर केलेला रेल्वे अर्थसंकल्प हा स्वप्नातील अर्थसंकल्प असून,या अर्थसंकल्पात कृतीपेक्षा केवळ संकल्पनांचाच सामावेश झाल्याने या अर्थसंकल्पातून राज्यातील जनतेला काही उपलब्धी झाली नाही.घोषणाबाज सरकारचा निराशाजनक अर्थसंकल्प असल्याचे सांगतानाच,राज्यातील प्रलंबीत रेल्वे प्रश्नांबाबत कोणतेही ठोस निर्णय नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
राज्यात मोठ्या प्रमाणावर नविन रेल्व सुरु होतील अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती.मात्र एकाही रेल्वे मार्गाचा सामावेश या अर्थसंकल्पात होऊ शकलेला नाही.
महाराष्ट्रात पुणे,नाशीक,यवतमाळ,नांदेड,मुं बई-शिर्डी,नगर-मनमाड,परळी -वाशीम येथील मार्गाबाबत ठोस तरतुद अर्थसंकल्पात झालेली दिसत नाही.राज्याबरोबर मुंबईतील आम आदमीकरता लोकल प्रवाससुद्धा महत्वपुर्ण असताना या लोकांचा कोणताही विचार अर्थसंकल्पातून झालेला दिसत नाही.70 ते 80 लाख प्रवासी प्रवास करतात त्या सर्व स्टेशनांवर आधुनिकीकरण व प्रवाशांना सोई सुविधा देण्याबाबत निर्णय झालेला नाही असे सागुन विखेपाटील म्हणाले की केवळ स्वप्न उभे करण्याचा हा अर्थसंकल्प असुन जाहिर केलेल्या घोषणांसाठी आर्थीक तरतुद कशी करणार याची कोणतीही स्पष्टता रेल्वेमंत्री देउ शकलेले नाही.
रेल्वे विभागाच्या विकासासाठी आवष्यक असलेला कोणताही कृती आराखडा या अर्थसंकल्पातून दिसत नाही.महाराष्ट्रात 726 किमी चा सागरी मार्ग असून साघारणतः आठ ठिकाणी खाजगी क्षेत्रातील प्रकल्प कार्यांन्वयीत करण्याची कार्यवाही सुरु असुन पीपीपी मार्गाने या बंदर प्रकल्पास कोकण रेल्वे व सेंट्रल रेल्वेशी जोडण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही याकडे लक्ष वेधुन विभागात 2.5 लाख जागा रिक्त आहेत पण या जागा भरण्याबाबत कोणतेही सुतोवाच या अर्थसंकल्पातुन झालेले नाही असे विखे पाटील यांनी सांगीतले
