मुंबईत सद्यस्थितीत कार्यान्वित असलेल्या एनटीसीच्या तीन गिरण्या विदर्भात हलवण्याचा आणि अन्य आठ गिरण्या विकासकाच्या घशात घालण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मात्र राज्य सरकारचा हा कुटील डाव कदापि खपवून घेतला जाणार नाही. या विरोधात गिरणी कामगार रस्त्यावर उतरतील, असा सज्जड इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिला आहे.
एनटीसीच्या मुंबईतील आजारी व बंद गिरण्यांच्या ठिकाणी विकास करण्यासाठी मंजुरी मिळण्याबाबत सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एनटीसीच्या अधिकार्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत गिरण्या विदर्भात हलवण्याच्या आणि काही गिरण्या विकासकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. एनटीसीच्या टाटा, पोदार, इंडिया युनायटेड मिल नं. ५ आणि दिग्विजय या गिरण्या सक्षमतेने कार्यरत आहेत. विरोधी पक्षात असताना उठवलेला आवाज त्यांना दिसत नाही. विदर्भातील कापूस उत्पादन क्षेत्रात गिरण्या हलवण्याचा घाट घातला जात असेल, तर मुंबई कापड उत्पादनाचे क्षेत्र म्हणून कसे नावाजले गेले याचे उत्तर मिळेल का, असा सवाल करत २00२ च्या सुमारास ७ बंद गिरण्यांच्या जागा विकून एनटीसीने कमवलेले कोट्यवधी रुपये
कोठे गेले, असा सवाल अहिर यांनी केला.
नमूद केलेल्या ७ गिरण्यांच्या जमीन विक्रीतून आलेल्या पैशामध्ये गैरव्यवहार झाला आहे. या संदर्भात एनटीसीच्या वरिष्ठ अधिकार्यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे.अँपिलेट अँथॉरिटीकडे प्रश्न प्रलंबित असताना आणि व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे तोट्यात दाखवून गिरण्या बंद करण्याचा कुटील डाव सहन केला जाणार नाही. आंदोलन आणि कायदेशीर मार्गाने हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. मुंबईतील पैसा मुंबईतच राहिला पाहिजे. याच ठिकाणी रोजगार निर्माण झाला पाहिजे; अन्यथा तीव्र आंदोलन होईल याची शासनाने दखल घ्यावी, असा इशारा अहिर यांनी दिला आहे.