अपंग-महिलांच्या डब्यात घुसखोरी करणार्‍यांवर कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अपंग-महिलांच्या डब्यात घुसखोरी करणार्‍यांवर कारवाई

Share This
मुंबई : उपनगरीय रेल्वेत दिवसेंदिवस होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने अपंग, कर्करोगाचे रुग्ण आणि महिलांसाठी स्वतंत्र डब्यांची व्यवस्था केली आहे. मात्र मागील काही वर्षांपासून या डब्यांमध्ये अपंग अणि महिला प्रवाशांव्यतिरिक्त इतर प्रवाशांचीच घुसखोरी वाढली आहे. गेल्या एका महिन्यात अपंगाच्या आणि महिलांच्या डब्यात घुसखोरी करणार्‍या २ हजार ९१५ प्रवाशांविरुद्ध रेल्वे पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याक डून ९ लाख २0 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
 
सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस अपंग, महिलांच्या डब्यात दादागिरी करून इतर प्रवासी प्रवास करतात. दारात उभे राहून इतर प्रवाशांना त्रास देणे, धक्काबुक्की करणे, अपंगांसाठी राखीव असलेली जागा अडवणे, शिवीगाळ करणे अशा प्रकारांविरुद्ध पश्‍चिम रेल्वे पोलिसांनी कडक क ारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नियमाप्रमाणे अपंगांच्या राखीव डब्यातून प्रवास केल्यास २00 रुपयांचा, तर महिलांच्या डब्यात घुसखोरी के ल्यास ५00 रुपये दंड आकारला जातो. मात्र दंड कमी असल्याने त्यासोबत कायद्याची भीती न उरल्याने घुसखोरांचे प्रमाण वाढले आहे. पश्‍चिम रेल्वे पोलिसांनी हाती घेतलेल्या या कारवाईला गर्दीच्या वेळेत साध्या वेशातील पोलीसच डब्याचा आसरा घेत असल्याचे अपंग प्रवाशांनी म्हटले आहे. तर रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार केल्यास तातडीने मदत मिळत नसल्याचे महिला प्रवाशांचे म्हणणे आहे.

कठोर कारवाई
कायद्याने महिला व अपंगांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या डब्यात घुसखोरी क रणे बंधनकारक आहे. जो प्रवासी कायदा मोडेल त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल.
- आनंद झा, मुख्य सुरक्षा आयुक्त, परे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages