विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व शैक्षणिक प्रगती लक्षात घेऊन सहलीचे आयोजन फेब्रुवारी महिन्याऐवजी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात करण्यात यावे, अशी मागणी पालिका माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सेनेने केली आहे. यासंबंधी आयुक्त सीताराम कुंटे यांना सेनेने निवेदन सादर केले आहे.
पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली आयोजित करण्यासाठी प्रशासनाने वर्ष २0१४-१५ च्या आर्थिक वर्षात १ कोटी ६६ लाख रुपयांची तरतूद केली आहे. शैक्षणिक सहली नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातच आयोजित करण्यात याव्यात, असे शासन व पालिकेच्या धोरणात नमूद करण्यात आले आहे. मात्र, तरीही शिक्षणाधिकारी जोगी यांनी परिपत्रक काढून प्रत्येक विभागातील विद्यार्थ्यांच्या सहली फेब्रुवारी २0१५ पर्यंत आयोजित करण्यात याव्यात, असे आदेश दिले आहेत. फेब्रुवारी २0१५ मध्ये इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गाचे मूल्यमापन चालू आहे. इयत्ता नववी व एसएससी विद्यार्थ्यांची सायन्स प्रॅक्टिकल सुरू आहे. तसेच २ मार्चपासून नववीच्या आणि ३ मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात सहल नेण्यास मुख्याध्यापकांनीही विरोध दर्शवला आहे. मात्र, जे मुख्याध्यापक सहकार्य करणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी धमकी जोगी यांनी दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी सहलीस नेण्यात येणार आहे, ते ठिकाण वीरा येथील वॉटर पार्क आहे. तेथील खर्चापेक्षा अधिक पैसे वसूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सेनेचे सरचिटणीस गोविंद ढवळे यांनी केली आहे.