मुंबई : राज्यात नवीन वाहन परवाना आणि वाहन नोंदणीसाठी आधार कार्डचा वापर केला जाऊ शकतो. यासंबंधी मोटार वाहन विभागाकडून राष्ट्रीय माहिती केंद्राला (एनआयसी) गळ घालण्यात आली आहे. त्यानुसार, आता वाहन व सारथी या दोन्हीही अँप्लिकेशन अद्यावयत करण्याची तयारी एनआयसीने केली आहे. आधार कार्डची लिंक एनआयसीसोबत जोडली गेल्यास पत्ता व वयाचा पुरावा देण्याच्या जाचक प्रक्रियेतून सुटका होण्याची शक्यता आहे.
सध्या वाहन परवाना व वाहन नोंदणीसाठी विविध कागदपत्रांची गरज लागते. शिकाऊ किंवा पक्का वाहन परवाना आणि वाहन नोंदणीसाठी वयाचा पुरावा देण्याकरिता शाळेचा दाखला, जन्म दाखला, पॅन कार्ड, निवासी पत्त्यासाठी एलआयसी पॉलिसी, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, पाण्याचे देयक, विद्युत देयक, सरकारी कामाची पे स्लिप यापैकी किमान दोन पुरावे द्यावे लागतात. मात्र, मोटार वाहन विभागाने एनआयसीसोबत वेबसाईट लिंक जोडल्यास ओळखपत्र म्हणून केवळ आधार कार्ड द्यावे लागणार आहे. यामुळे वेळ तसेच कागदपत्रांच्या त्रासातून सुटका होणार आहे. एनआयसीने शिकाऊ वाहन परवाना व वाहन नोंदणीसाठी सारथी व वाहन या दोन वेबसाईट्सची निर्मिती करण्यात आली आहे. या दोन्ही वेबसाईट्स अद्यावयत करून आधार कार्डची तरतूद होण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने एनआयसीने प्रत्येक आरटीओकडून अभिप्राय देखील मागवला आहे. एनआयसीकडून अद्ययावयत करण्यात येणार्या दोन्ही वेबसाईट्सना आधार कार्ड व्यतिरिक्त ऑनलाइन परमिट, फिटनेस परमिट नूतनीकरण करण्यात येणार आहे.