मिराताई आंबेडकर बुद्धिस्ट सोसायटीच्या अध्यक्षा नाहीत - सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मिराताई आंबेडकर बुद्धिस्ट सोसायटीच्या अध्यक्षा नाहीत - सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

Share This
मुंबई । अजेयकुमार जाधव
दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ़ इंडिया ( भारतीय बौद्ध महासभा ) च्या अध्यक्ष पदी मिराताई आंबेडकर झालेली निवड ही चुकीची असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते. उच्च न्यायालायाचा हाच निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला असल्याचे प़ी. जी. ज्योतीकर यानी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजीत पत्रकार परिषदेत सांगीतले.

बाबासाहेब आंबेडकर यानी स्थापन केलेल्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या अध्यक्ष पदी बाबासाहेबांच्या नंतर भैयासाहेब यांची निवड करण्यात आली होती. भैयासाहेब यांच्या मृत्यु नंतर मिराताई यानी 6 ओक्टोबर 1987 साली चेंज रिपोर्ट सादर केला होता. हां चेंज रिपोर्ट 14 ओक्टोबर 1978 मधे धर्मादाय आयुक्तानी फेटाळला होता. 24 जुलै 1981 ला धर्मादाय आयुक्त यानी एक स्कीम तयार केली या स्कीम मधे मिराताई यांचे नाव नव्हते. म्हणून त्यानी या स्कीम ला विरोध करत 8 डिसेम्बर 1981 ला हरकत घेतली होती. या अर्जानंतर मिराताई याना 11 सप्टेम्बर 1987 ला अध्यक्ष घोषीत करण्यात आले. परंतू अशोक आंबेडकर आणि इतर लोकानी हाय्कोर्ट मधे 14 ओक्टोबर 1987 ला आव्हान दिले होते. 21 जून 2013 रोजी उच्च न्यायालयाने मिराताई याना अध्यक्ष पदी नेम्नयाचा निर्णय रद्दबातल केला. 19 ऑगस्ट 2013 ला मिराताई यानी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असता 2 फेब्रुवारी 2015 सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम केला असल्याचे ज्योतिकर यानी सांगीतले.
सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला असल्याने आता मिराताई याना संस्थेच्या अधक्ष राहता येणार नाही तसेच संस्थेचे नाव वापरता येणार नाही असे ज्योतिकर यानी सांगीतले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया मुले डॉ. पी. जी. ज्योतिकर; चंद्र्बोधी पाटील; सुभाष जोंजाले; व्ही.एस. मोखले; डॉ. हरिष राव्लीया; बी. के. बर्वे; जगजीवन प्रसाद हे सात ट्रस्टी आता संस्थेचे कामकाज बघतील असे ज्योतिकर यांनी सांगीतले. मिराताई याना अध्यक्ष पदावरून काढले असले तरी मिराताई आणि प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शन वेळोवेळी घेतले जाईल. बौद्धांचा स्वंतंत्र कायदा असावा त्यासाठी बौद्ध लोकांची नोंदणी मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री याना भेटून आम्ही बौद्ध आहोत आमच्या मागे हिन्दू किंवा हिन्दू बौद्ध ही उपाधी लावू नये अशी मागणी करणार असल्याचे बी.के. बर्वे यांनी पत्रकारांना सांगीतले. यावेळी चंद्रबोधी पाटील; व्ही. एस. मोखले; हरिष रवालिया; सुभाष जौंजाले इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages