मुंबई : स्वाईन फ्ल्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले असतानाच स्वाईन फ्ल्यू हा फुफ्फुस व हृदयाचा आजार आहे तसेच हा आजार रोखण्यासाठी मुंबईत वृक्ष लावणे गरजेचे असल्याचा जावईशोध महापौर स्नेहल आंबेकर यांनी लावला आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
स्वाईन फ्ल्यूने संपूर्ण देशात थैमान घातले असून आतापर्यंत ६५0 जणांचा मृत्यू झाला आहे, तर १0,000 लोकांना स्वाईन फ्ल्यूची बाधा झाली आहे. महाराष्ट्रात स्वाईन फ्ल्यूच्या बळींचा आकडा ८३ झाला आहे. मुंबईतही स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईबाहेरून मुंबईत उपचारासाठी आलेल्या रुग्णांची त्यात आणखीन भर पडत असल्याने ही संख्या वाढतच चालली आहे. मुंबईत आतापर्यंत स्वाईन फ्ल्यूच्या २२४ रुग्णांची नोंद झाली. त्यात १६३ रुग्ण मुंबईतील आहेत तर स्वाईन फ्ल्यूने १0 जणांचा बळी घेतला आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे मुंबईकरांत भीतीचे वातावरण पसरले असतानाच स्वाईन फ्ल्यू हा फुफ्फुस व हृदयाचा आजार असल्याचे व हा आजार रोखण्यासाठी मुंबईत झाडे लावण्याची गरज असल्याचे मत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौरांनी व्यक्त केले. त्यांच्या या अज्ञानाबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
यापूर्वीही मुंबईत डेंग्यूचा प्रकोप वाढलेला असतानाच, डेंग्यू हा साधा आजार असून प्रसारमाध्यमांनी त्याला मोठे केले, असे अजब विधान महापौरांनी केले होते. आता स्वाईन फ्ल्यूच्या बाबतीतही त्यांनी हे वादग्रस्त विधान केल्याने त्या आणखीनच वादाच्या भोवर्यात सापडल्या आहेत.