४६ रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

४६ रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत

Share This
मुंबई : उपनगरीय रेल्वे स्थानकांवर घडणार्‍या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांना किंवा रेल्वे प्रशासनाला सीसीटीव्हीची मोठय़ा प्रमाणात मदत मिळते. मात्र आजही काही स्थानकांवर सीसीटीव्ही नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. तब्बल एक-दोन नव्हे तर ४६ रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या स्थानकांवर एखादा गुन्हा घडल्यास तपास करायचा कसा, असा प्रश्न रेल्वे पोलिसांसमोर आहे.
उपनगरीय रेल्वे मार्गावर पाकीटमारीपासून ते लहान मुले चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. ज्या स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत त्यांचा दर्जा चांगला नसल्याने रेल्वे पोलिसांना तपासात मोठी अडचण येते. सीसीटीव्ही असतानाही गुन्ह्याचा तपास करताना रेल्वे पोलिसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. एकूण १३६ उपनगरीय रेल्वे स्थानके आहेत. त्यापैकी ६ टर्मिनल आहेत. उपनगरीय रेल्वे मार्गावरील ४६ रेल्वे स्थानके आजही सीसीटीव्हीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही नसलेल्या स्थानकांवर गुन्हा घडल्यास तपास करायचा कसा, असा प्रश्न पडल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. मध्य रेल्वे मार्गावरील ३६, तर पश्‍चिम रेल्वे मार्गावरील १0 स्थानकांचा यात समावेश आहे. 

सीसीटीव्ही नसलेली स्थानके
मध्य रेल्वे - दिवा टर्मिनस, निळजे, तळोजा, कळंबोली, दातीवली, नावडे रोड, ऐरोली, क ोपर रोड, भिवंडी, खारबाव, क ामन, जूचंद्र, शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी, कसारा, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी,पळसदरी, केळवली, डोलवली, लवजी, खोपोली, जुम्मापट्टी, माथेरान.
पश्‍चिम रेल्वे - वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उपरोळी, बोईसर, वानगाव, डहाणू रोड,घोलवड, बोर्डी रोड़

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages