मुंबई : पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने शीतपेय व मिनरल वॉटर कंपन्यांच्या जलआकारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शीतपेय व बाटलीबंद पाण्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई मनपाने झोपडपट्टय़ांच्या पाणी दरात अर्थसंकल्पात ३५ पैसे वाढ सुचवली. आता हे पाणी वापरून ते महागड्या दराने विकणार्या शीतपेय व मिनरल वॉटर कंपन्यांच्या पाणीदरातही ५0 टक्के दरवाढ करण्याचे ठरवले आहे. शीतपेय व बाटलीबंद पाणी विकणार्या कंपन्यांना यापूर्वी मनपा १000 लिटर पाण्यासाठी ३८ रुपये दर आकारत होती. त्यानंतर ६४.८0 रुपये दर आकारला जाऊ लागला. आता पालिकेने पुन्हा या दरात वाढ करून १000 लिटर पाण्यासाठी ९0 रुपये दर आकारल्याचे प्रस्तावित केले आहे.