राणीबागमध्ये डिसेंबरपर्यंत पेंग्विन येणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राणीबागमध्ये डिसेंबरपर्यंत पेंग्विन येणार

Share This
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात येत्या डिसेंबरपर्यंत पेंग्विन पक्ष्यांचे आगमन होणार आहे. मुंबई मनपाच्या राणीच्या बागेचा सध्या कायापालट सुरू आहे. या उद्यानात सहा हम्बोल्ट पेंग्विन पक्षी आणण्यासंदर्भात प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. या पेंग्विनकरिता विकसित करण्यात आलेल्या सुविधांबाबत अभ्यास करण्यासाठी पालिकेकडून संबंधित पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना सिंगापूर येथील झुऑलॉजिकल पार्क व बँकॉक येथील अन्य पार्कमध्ये पाठवण्यात येणार आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages