बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाद्वारेविविध नैसर्गिक व मानवीय आपत्तींचे करण्यात आलेले सुयोग्य व्यवस्थापन कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन न्यूयॉर्क शहराचे माजी महापौर मायकेल ब्लूमबर्ग यांनी केले. ते (दि. १७.०२.२०१५) महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देते वेळी उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते.
याप्रसंगी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, महापालिका आयुक्त सीताराम कुंटे,अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) एस. व्हि. आर. श्रीनिवास, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) संजय देशमुख, सह आयुक्त एस. एस. शिंदे यांच्यासह महापालिकेच्या संबंधित विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.