मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील कोतावालाना चतुर्थश्रेणीचा दर्जा बहाल करावा यासाठी राज्य सरकारचे अर्थमंत्री सुधीर मुंनगुंटीवार यांनी हिवाळी अधिवेशनात आश्वासन देवूनही हे आश्वासन पाळले नसल्याने महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समितीच्या उत्तमराव गवई यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करण्यात येत आहे.
मागील आघाडी सरकार आणि आताच्या महायुतीच्या सरकारकडून कोतवालाना चतुर्थश्रेणी मध्ये समावेश करण्यासाठी नुसती आश्वासने देण्यात येत आहेत. कोतवालांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात मुंनगुंटीवार यांनी महसुल मंत्र्यांना ९ फेब्रुवारीला पत्र दिले आहे. कोतवालांच्यावतीने सातत्याने निदर्शने आणि उपोषणे केली जात असली तरी सरकार मात्र दुर्लक्ष करत असल्याने अद्याप कोतवालाना न्याय मिळाला नसल्याचे गवई यांनी सांगितले. कोतवालाना चतुर्थश्रेणी बहाल करावी, सेवा निवृत्त कोतवाल व दिवंगत कोतवालांच्या विधवाना ३००० रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा यासाठी अर्थ खात्याने आर्थिक तरतूद करावी इत्यादी मागण्याबाबत उपोषण करण्यात येत असल्याचे गवई यांनी सांगितले.
