रिलायन्सकडूनही वीजदराचा प्रस्ताव दाखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रिलायन्सकडूनही वीजदराचा प्रस्ताव दाखल

Share This
मुंबई : मुंबईतील पूर्व व पश्‍चिम उपनगरात वीजपुरवठा करणार्‍या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून 0 ते १00 युनिट वापरणार्‍या घरगुती ग्राहकांच्या वीज दरामध्ये ३५ टक्के कपात करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. त्याचबरोबरो औद्योगिक वीज ग्राहकांना मात्र अधिक दराने वीज बिल भरावे लागणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. 


मुंबईच्या पूर्व व पश्‍चिम उपनगरात वीजपुरवठा करणार्‍या रिलायन्सने मॉल, आयटी कंपन्या विविध व्यावसायिक संस्था यांच्यासाठी दरवाढ प्रस्तावित केली आहे. त्यामुळे ३00 युनिटपेक्षा अधिक युनिट वापरणार्‍या ग्राहकांना १४ ते ३५ टक्क्यांपर्यंतची वाढ लागू होण्याची शक्यता आहे. शून्य ते १00 युनिट वापरणार्‍या ३५ टक्के तर १0१ ते ३00 युनिट वापरणार्‍या ग्राहकांना ९ टक्के कपात करण्यात येणार आहे. पूर्व पश्‍चिम उपनगरात रिलायन्सच्या २९.१२ लाख ग्राहकांपैकी २0 लाख घरगुती ग्राहक असून, त्यांच्यातील १८.५ लाख ग्राहक महिन्याला ३00 युनिटपर्यंत विजेचा वापर करतात.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages