राज्यभरात वीज बिलांची शुक्रवारी होळी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यभरात वीज बिलांची शुक्रवारी होळी

Share This
मुंबई : राज्य सरकारने अनुदान बंद केल्यापासून राज्यातील सर्व औद्योगिक ग्राहक व ३00 युनिटच्या आतील सर्वसामान्य घरगुती ग्राहक यांच्या वीज बिलात २२ ते २३ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय पुन्हा महावितरणने वीज दरवाढ प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून इलेक्ट्रिसिटी ड्यूटीसह एकूण अंदाजे ३४ ते ३५ टक्के वाढ लागू होणार आहे. या वीज दरवाढीच्या विरोधात २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक शासकीय व महावितरण कार्यालयांवर मोर्चा व वाढीव दराच्या वीज बिलांची होळी हे आंदोलन निश्‍चित करण्यात आले आहे.


त्यानुसार किमान २0 जिल्ह्यांमध्ये ७0 ठिकाणी वीजग्राहक रस्त्यावर येऊन वीज बिलांची होळी करतील, अशी माहिती वीजग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने प्रताप होगाडे यांनी दिली आहे. वारंवार होणारी दरवाढ आणि दरवाढ कपातीचे आश्‍वासन यांना विरोध म्हणून करण्यात येणार्‍या या आंदेलनात ५ लाख वीजग्राहक पोस्टकार्डे, पत्रे, एसएमएस, ई मेल अशा सर्व माध्यमांचा वापर करण्यात येत असून ही दरवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे. ही मोहीम १५ मार्चपर्यंत सुरू राहणार असून होळी आंदोलनानंतर राज्य सरकारने प्रतिसाद न दिल्यास अधिक तीव्र व उग्र आंदोलनाची घोषणा करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages