बेस्टने ८ बसमार्ग बंद केल्याने बेस्ट समिती नाराज - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टने ८ बसमार्ग बंद केल्याने बेस्ट समिती नाराज

Share This
बेस्ट उपकमाने १ फेब्रुवारी पासून अल्पप्रतिसादाचे कारण देत ८ बसमार्ग बंद केले. या निर्णयाचे तीव्र पडसााद आज बेस्ट समितीच्या बैठकीत उमटले. सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत अशा एकामागून एक बसमार्ग बंद पडले. तर प्रवाशीसंख्या घटेल. अशी भितीही व्यक्त करीत बेस्ट प्रशाासनाने बंद केलेल्बा बस मार्गावर फेरविचार करण्याची मागणी सदस्यांनी केली. 

बेस्ट परिवहन विभागाने ८ बसमार्ग बंद करण्यापूर्वी प्रवाशांच्या गैरसोयींचा विचार करायला हवा होता. एकिकडे १ फेब्रुवारी बेस्टने केलेली भाडेवाढ व दुसरीकडे याच दिवसापासून ८ बसमार्ग बंद केल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होईल, अशी भिती बेस्ट समिती सदस्य सुनिल गणाचार्य यांनी व्यक्त केली. 

बेस्टने बंद केलेल्या बसमागार्बाबबत कारणे द्यावीत, अशी मागणाी काँग्रेसचे शिवाजी सिंह यांनी केली. सी ५२ जलद बस वडाळा कळंबोली बंद केल्याने या बसने प्रवास करणाऽया बेस्ट कर्मचारी गैरसोय जाल्याचे शिवसेनेचे सुहास सामंत म्हणाले. 

बेस्टच्या किती बसगाड्या फायद्यात आहेत. किती उत्पन्न कमी जाले? किती प्रवासी ....? किती बस रिकामी धावतात, याची आकडेवारी द्या. खाजगी संस्थेमार्फत सर्व्हे करावा, अशी मागणी मनसे सदस्य हुंनाळकर यांनी केली. 

बेस्टच्या ३00बसगाड्या बंद होणारबेस्टच्या ३00 बसगाड्या जुन्या जाल्या असून त्या भंगारात काढाव्या लागतील, अशी माहिीती बेस्टचे उप महाव्यवस्थापक देशपांडे यांनी दिली. म्हणजेच बेस्टच्या जुन्या ३00बसगाड्या बंद होणार आहेत. त्यामुळे अनेक बस मार्ग बंद पडण्याची शक्यता आहे. जोपर्यंत नवीन खरेदी केलेल्या बसगाड्या ... येणार नाहीत. तोपर्यंत बसगाड्याची कमतरता असणार आहे. बेस्टला नवी मुंबईत धावणाऽया बसगाडीसाठी ११00 रु. टोल द्यावा लागातो. त्यामुळे व अल्पप्रतिसादामुळे बसमार्र्ग  ींए्- ५0३ व ८-५२ हे बसमर्ग बंद केले. असेही देशपांडे यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages