मुंबई : लोकलमधून प्रवास करणार्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर कार्यरत असलेल्या 'निर्भया' पथकाचे मनुष्यबळ वाढवले जाणार आहे. महिलांच्या डब्यातील सोनसाखळी चोर आणि पाकीटमारांना जाळ्यात पकडणार्या या पथकांत १0 अतिरिक्त कर्मचार्यांची भर पडणार असल्याची माहिती जीआरपी आयुक्त रवींदर सिंगल यांनी दिली. त्यामुळे महिला प्रवाशांची सुरक्षा आणखी भक्कम होणार असल्याची चिन्हे आहेत.
'निर्भया' पथकाच्या सदस्यांनी गेल्या वर्षभरात ५६ गुन्ह्यांचा उलगडा करून ३0 गुन्हेगारांना जाळ्यात पकडले. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला सर्वप्रथम मध्य रेल्वेवर हे पथक कार्यान्वित करण्यात आले. त्या वेळी या पथकासाठी १५ कर्मचार्यांची निवड केली होती. सप्टेंबर २0१४ मध्ये या पथकाच्या कार्यकक्षा विस्तारण्यात आल्या व अतिरिक्त १५ कर्मचार्यांची भर घालून पश्चिम रेल्वेवरही हे पथक कार्यरत झाले. लवकरच या पथकाची सदस्य संख्या ३0 ते ४0 होणार असल्याचे आयुक्त सिंगल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सोनसाखळी चोरी, पाकीटमारीच्या गुन्ह्यांत चांगल्या कुटुंबातील गुन्हेगारांचाही सहभाग 'निर्भया' पथकाने उघडकीस आणला आहे. दक्षिण मुंबईत एका बँकेत काम करणारी महिला कामावरून घरी परतताना महिलांच्या डब्यात चोरी करायची. तसेच एका चोरी प्रकरणात सुरक्षा रक्षक महिलेलाही ताब्यात घेण्यात आले. गुन्हा करताना आपण पकडले जाऊ नये, यासाठी गुन्हेगार नव्या क्लृप्त्या लढवू लागले आहेत, असे 'निर्भया' पथकातील कॉन्स्टेबल विद्या देशमुख यांनी सांगितले. पथकाने गेल्या वर्षी मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे (१४ गुन्हे) आणि दादर(१२ गुन्हे) विभागांत सर्वाधिक गुन्ह्यांची उकल केली.