ठाण्यात ग्रंथोत्सव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ठाण्यात ग्रंथोत्सव

Share This
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने दि. 13, 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी ठाणे‘ ग्रंथोत्सव‘ चे आयोजन करण्यांत आले आहे. हा तीन दिवसीय ग्रंथोत्सव तलावपाळी समोरील शिवाजी मैंदानावर होणार आहे. शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होणार असून सुप्रसिध्द साहित्यिक अरुण साधू आणि शाहीर संभाजी भगत यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी या दोघांचीही मुलाखत आयोजित केली आहे. 


या उद्घाटन समारंभाला जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी, ठाणे मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष मा.य.गोखले, उपसंचालक (माहिती) र.द. वसावे उपस्थित राहणार आहेत.साधू आणि भगत यांची मुलाखत अरुण म्हात्रे, डॉ. महेश केळूसकर, डॉ. अनुपमा उजगरे घेणार आहेत. रात्रौ 9 ते 10 या वेळेत 'कुसुमाग्रज एक नक्षत्र ' हा कवीवर्य कुसुमाग्रजांच्या कविंतावर आधारित काव्य गायनाचा कार्यकम ’ झपुर्झा हा ग्रुप सादर करणार आहे. 

शनिवारी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत‘ सोशल मीडिया साहित्यावर मात करीत आहे काय? ’हा परिसंवाद होणार असून त्यात मिलिंद बल्लाळ,  कैलास म्हापदी, ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे, ज्येष्ठ पत्रकार भगवान निळे, सामाजिक कार्यकर्ती हर्षदा बोरकर आणि इंटरनेट पत्रकारितेचे अभ्यासक डॉ. गणेश मुळे, सहभागी होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत ‘साहित्याचा सिनेमा आणि नाटकावरील प्रभाव’ हा परिसंवाद आयोजित केला आहे. यामध्ये ज्येष्ठ चित्रपट समिक्षक सुधीर नांदगावकर, निर्माते-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, अभिजित पानसे, अभिनेता चिन्मय  मांडलेकर, लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, ‘गृहशोभिका’च्या संपादिका आसावरी जोशी या सहभागी होणार आहेत. 

संमेंलनाच्या तिस्रया दिवशी रविवारी रोजी सायंकाळी 4.30 ते 6.30 या वेळात जिह्यातील कवींचे कवीसंमेंलन होणार असून अध्यक्षस्थानी प्रसिध्द कवी मधुकर आरकडे असणार आहेत. यामध्ये जवळपास पंचवीस कवी सहभागी होतील. सायंकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत संमेंलनाचा समारोप विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे यांच्याहस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द कवी अशोक नायगांवकर असतील. त्यानंतर सायंकाळी 7 ते 9 या वेळेत प्रसिध्द कवी नामदेव ढसाळ यांना अभिवादन कार्यकम होईल. यामध्ये  मलिका अमरशेख, निळकंठ कदम,अशोक नायगांवकर, अरुण म्हात्रे सहभागी होतील. 

तीन दिवस चालणार गथोत्सवात प्रसिध्द प्रकाशन संस्थेची जवळपास 25 स्टॉल असून ग्रंथ विक्री सकाळी 10 ते रात्रौ 9 पर्यंत सुरु राहणार आहे. जिह्यातील साहित्यप्रेमी नागरिक, विद्यार्थ्यांनी या महोत्सवात हजेरी लावून ग्रंथोत्सवास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. सं.शि.खराट यांनी केले आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages