मुंबई : मुंबई महापालिकेतील मलनि:स्सारण विभा गातील कर्मचार्यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, कंत्राटी कर्मचार्यांना कायम करावे, अशी मागणी सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी मंगळवारी पालिकेच्या सभागृहात केली. सदस्यांच्या चर्चेला उत्तर देताना, १५0 पेक्षा जास्त रिक्त असलेली पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सभागृहाला दिली.
शहर आणि दोन्ही उपनगरांतील पालिकेच्या २२७ विभागांत मलनि:स्सारण वाहिन्या तसेच पर्जन्य जलवाहिन्या आणि लहान-मोठे नाले तुंबतात. त्याचा त्रास लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य जनतेला होतो. या विभागांमध्ये सफाई कर्मचार्यांची कमतरता आहे, अशी तक्रार विरोधी पक्षनेते देवंेद्र आंबेरकर, समाजवादी पक्षाचे नगरसेवक आश्रफ आजमी, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय पिसाळ यांनी सभागृहात केली.