मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात पालिका प्रशासनाने झोपडपट्टीधारकांवर लादलेला मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची दरवाढ त्वरित रद्द करावी, अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी दिला आहे.
मुंबईतील ६0 टक्क्यांपेक्षा जास्त नागरिक झोपड्यांमध्ये राहतात. गरीब, सामान्य नागरिक आधीच विविध समस्यांनी ग्रासलेले असताना या झोपडीधारकांवर पालिकेने आता मालमत्ता कराचा भार टाकणे व त्यांच्या पाणीपट्टीत प्रति हजार लिटरमागे ३५ पैसे दरवाढ करणे अन्यायकारक आहे. या झोपडीधारकांना अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा होतो. त्यांच्यासाठी शौचालयांची चांगली सुविधा नाही. काही ठिकाणी झोपडपट्टीधारकांना पाणी माफियांकडून पाणी काळ्या बाजारात विकत घ्यावे लागते. काँग्रेस आघाडी सरकार सत्तेत असताना २000 पर्यंतच्या झोपड्या अधिकृत केल्या. याउलट पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने झोपडीधारकांवर करांचा बोजा लादला आहे. यामुळे या करवाढीस काँग्रेस कडाडून विरोध करेल, असा इशारा आंबेरकर यांनी दिला आहे.