रस्त्यांवरील सुरक्षेबाबत जनजागृती होऊन रस्त्यांवरील अपघातांची संख्या कमी व्हावी व रस्ता सुरक्षेबाबत अनुकूलता वाढावी, यासाठी ब्लूमबर्ग फिलॉनथ्रोपिज या जागतिक संस्थेद्वारे जगभरातील निवडक १० शहरांमध्ये राबविण्यात येणा-या एक विशेष प्रकल्पामध्ये मुंबई शहराची निवड झाली आहे. सदर प्रकल्प पुढील पाच वर्षांच्या कालावधीत बृहन्मुंबई महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त एस. व्हि. आर. श्रीनिवास यांनी दिली. मुंबईतील रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी व रस्त्यांवरील सुरक्षेसाठी महापालिका सदैव कटिबद्ध आहे व या कटिबद्धतेचा एक भाग म्हणून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे, असेही प्रतिपादन त्यांनी या बैठकीच्या प्रारंभी केले. ते (दि. १७.०२.२०१५) रस्ता सुरक्षा विषयक प्रस्तावित प्रकल्पाच्या प्राथमिक बैठकीदरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते.
ब्लूमबर्ग फिलॉनथ्रोपिज च्या सहकार्याने राबविण्यात येणा-या रस्ता सुरक्षा विषयक प्रकल्पाबाबत अधिक माहिती देताना अतिरिक्त महापालिका आयुक्त एस. व्हि. आर. श्रीनिवास यांनी सांगितले कि, रस्ता सुरक्षेबाबत सर्वस्तरीय जागृती होऊन रस्त्यांवर होणा-या विविध प्रकारच्या अपघातांची संख्या कमी व्हावी हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प अधिकाधिक व्यापक व सर्वसमावेशक व्हावा याकरिता राज्य सरकारच्या अखत्यारीत असणा-या संबंधित यंत्रणा तसेच परिपूर्ण जनजागृती साठी शिक्षण विभागाचा देखील या प्रकल्पाच्या चमुमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रकल्पासंबंधी सर्वांना सुयोग्य प्रशिक्षण देण्याकरिता लवकरच प्रशिक्षण कार्यशाळांचे विविध स्तरावर आयोजन करण्यात येणार आहे. ह्या प्रकल्पांतर्गत पहिली कार्यशाळा येत्या मार्च महिन्यात प्रस्तावित करण्यात आली असून ह्या कार्यशाळेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक येणार असल्याची माहिती देखीलआज संपन्न झालेल्या बैठकी दरम्यान संबंधित प्रतिनिधींनी दिली.