बेपत्ता रेल्वे प्रवाशांची संख्या वाढतेय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेपत्ता रेल्वे प्रवाशांची संख्या वाढतेय

Share This
मुंबई : मुंबईकरांची लाईफलाइन उपनगरी रेल्वे स्थानकांमधून बेपत्ता होणार्‍या प्रवाशांचे प्रमाण वाढले आहे. २0१४ मध्ये तब्बल २१0 प्रवासी बेपत्ता झाल्याची नोंद रेल्वे पोलिसांकडे असून २0१३ मध्ये १६२ प्रवासी बेपत्ता झाले होते. मात्र, या प्रवाशांना शोधून काढण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. २0१४ मध्ये १४९ प्रवाशांना शोधून काढण्यात आले आहे.
देशाच्या कानाकोपर्‍यातून अनेकजण मुंबईत येतात. काही जण आपल्या मित्र-नातेवाईकांसोबत कामानिमित्त येत असतात. यामध्ये महाराष्ट्राबाहेरून येणार्‍यांची संख्या जास्त आहे. यातील बहुसंख्या प्रवाशांना मुंबईतील रेल्वे स्थानकांची, मार्गाची माहिती नसते. लोकलच्या गर्दीत चढताना-उतरताना आपला मित्र-मैत्रीण किंवा नातेवाईक हरवून बसतात. अशा बेपत्ता झालेल्यांची नोंद रेल्वे पोलिसांकडे केली जाते. २0१४ मध्ये २१0 प्रवासी बेपत्ता झाल्याची नोंद रेल्वे पोलिसांकडे करण्यात आली असून १४९ प्रवाशांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या बेपत्ता झालेल्यांमध्ये ८९ पुरुषांचा आणि ७४ महिलांचा समावेश आहे. तसेच ३0 मुली, १७ मुलांचा समावेश आहे. २0१३ मध्ये १६२ प्रवासी बेपत्ता झाले होते. त्यापैकी १२५ प्रवाशांचा तपास करण्यात आला होता. या बेपत्ता झालेल्या प्रवाशांमध्ये गतिमंद, अंध व्यक्ती यांसारख्या अन्य प्रवाशांचाही समावेश आहे.
बेपत्ता प्रवाशांची आकडेवारी
वर्ष  मुले  मुली  महिला  पुरुष
२0१४  १७  ३0  ७४  ८९
२0१३  १५  ११  ६४  ७२

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages