जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण देशाच्या प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात फोफावत आहे, याचा थेट परिणाम मागासवर्गीय समाजातील शिक्षित तरुणांना होणार आहे. खाजगीकरणामुळे औद्योगिक क्षेत्रातील आरक्षण जवळपास बंद करण्यात आले आहे. या क्षेत्रातील उच्च जातीच्या लोकांची आरक्षण विरोधी भूमिका असल्यामुळे आपल्याला अराजकीय संघटना स्थापन करून शासन व प्रशासनाच्या विरोधात दबावगटाच्या माध्यमातून खासगी क्षेत्रातील वाढत्या आरक्षणविरोधी भूमिकेचा विरोध करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी केले. भारतीय मागासवर्गीय हितकारणी परिषदेच्या वतीने कालिना येथील मुंबई विद्यापीठाच्या जे. पी. नाईक भवनमध्ये आयोजित चर्चासत्रात थोरात बोलत होते.
राज्यात गरिबी व कुपोषणाचे प्रमाण भयानक आहे. खान्देशातील जनतेला त्याची झळ जास्त लागत आहे. मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना आजही कामाच्या ठिकाणी व नोकरीसाठी संघर्ष करावा लागतो आहे, असे थोरात पुढे म्हणाले. आपण स्वत: समाजाच्या विकासासाठी कार्यतत्पर राहून समाजातील सामाजिक संघटनेच्या लोकांना, उच्च शिक्षित अधिकार्यांना, अभियंत्यांना, डॉक्टरांना, वकील तसेच प्राध्यापकांना एकत्र करून अराजकीय संघटना स्थापन करणार असल्याची भूमिका थोरात यांनी व्यक्त केली. सत्याग्रह कॉलेजचे प्राचार्य डॉ. डोंगरगावकर, मार्टिन मकवान, उपकुल सचिव दिनेश कांबळे, प्रा. विजय खरे, प्रा. बाबासाहेब कांबळे, डॉ. भावना राठोड, प्रकाश मोरे, नाबार्डचे अधिकारी विजय खापेकर, प्रा. संदेश वाघ, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रल्हाद जोगदंड यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत प्रा. गौतम गवळी यांनी केले.