भारत ग्यासचा तुडवडा - रॉकेल ही नाही / मुंबईकरांवर बुरे दिन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भारत ग्यासचा तुडवडा - रॉकेल ही नाही / मुंबईकरांवर बुरे दिन

Share This
मुंबई / प्रतिनिधी - "अच्छे दिन आणे वाले है" सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला एक वर्षही झाले नसताना मुंबई मधील काही भागा मध्ये ग्यासचा तुटवडा झाला आहे तर दुसरीकडे रॉकेलही मिळत नसल्याने मुंबई मधील नागरिकांवर उपासमारिची वेळ आल्याने मुंबईकर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

मिळालेल्या माहिती नुसार मुंबई मध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या दोन कंपन्याकडून ग्यासचा पुरवठा केला जातो. मुंबईमध्ये घाटकोपर आणि इतर कित्तेक ठिकाणी भारत पेट्रोलियमचा भारत ग्यास मिळत नसल्याच्या तक्रारीमध्ये वाढ होत चालली आहे. ग्यास मिळत नसल्याने अनेक ग्राहकांच्या घरातील ग्यास संपले असताना नंबर देवूनही १२ ते १४ दिवस ग्यास मिळत नसल्याची तक्रार आहे. ग्यासचा तुटवडा असल्याने ग्यासचा पुरवठा होत नसल्याचे समजते. 

एकीकडे मुंबईकर नागरिकांच्या घरात ग्यास नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात रॉकेल मिळण्यासाठी शिधावाटप दुकानांवर खेपा मारत आहेत परंतू रॉकेलचा कोटा कमी केल्याने रॉकेल मिळणेही मुश्किल झाले आहे. नागरिकांना ग्यास आणि रॉकेल मिळत नसल्याने घाटकोपर आणि रेटार ठिकाणच्या शिधावाटप दुकानदारांचे चांगलेच फावले असून रॉकेल ५५ ते ७० रुपये लिटरने ब्ल्याकने विकले जात आहे. भारत ग्यासच्या सर्वच ग्राहकांना असा अनुभव येत असल्याने मुंबईकर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून हेच अच्छे दिन येणार होते का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages