पानसरेंच्या हत्येच्या निषेधार्थ मूकमोर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पानसरेंच्या हत्येच्या निषेधार्थ मूकमोर्चा

Share This
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ कोंकण रिपब्लिकन सामाजिक संघटनेने वांद्रे (पूर्व) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी मूकमोर्चा काढला. या वेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या तोंडावर काळ्या पट्टय़ा बांधून निदर्शने केली. 
संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मोरे, सचिव गणेश खैरे, संजय कापसे, संघराज तांबे, विश्‍वास र्मचंडे, विकास चक्रे, अमर कासारे, गौतम जाधव, लॉरेन्स गोन्साल्विस, अमर चाफे, नरेंद्र जगताप, महेंद्र चाफे, रवींद्र सोनावणे, बबन मोरे आदी कार्यकर्त्यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांची भेट घेतली व कॉ. पानसरे यांच्यावर भ्याड हल्ला करणार्‍या आरोपींना तत्काळ अटक करून देहदंड देण्यात यावा, या मागणीचे निवेदन सादर केले. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केल्यानंतर मोर्चाचे रुपांतर छोटेखानी सभेत झाले. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कोंकण रिपब्लिकन संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मोरे म्हणाले की गेल्या काही वर्षांपासून देशात प्रतिगामी, धर्मांध, जातीयवादी, विषमतावादी शक्तीला लोकशाहीत जास्त बळ मिळत आहे. परिणामी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी विचारांना धोका निर्माण झाला आहे. त्यांना पुरोगामी विचार आणि पुरोगामी चळवळ नष्ट करायची आहे; पण आपण असे होऊ देणार नाही. वेळ पडल्यास आक्रमकतेने अशा शक्तीचा मुकाबला करण्याचा इशारा प्रकाश मोरे यांनी या वेळी दिला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages