बेजाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
मुंबई / अजेयकुमार जाधव
पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यानी कचराकुंड्यामध्ये लागणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवर भारताचे मानचिन्ह अशोक स्तंभ छापल्याने पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच कचराकुंड्यामध्ये लागणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवर अशोक स्तंभ छापून घेणाऱ्या पश्चिम रेल्वे प्रशासना विरोधात रेल्वे प्रवाशी व आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्या लावण्यात आल्या आहेत. या कचरा कुंड्यांमधील कचरा जमा करण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. कचरा जमा केल्या जाणारया प्लास्टिक पिशव्यांवर पाशीं रेल्वेने आपला लोगो छापून घेतला आहे. या लोगो मध्येच भाताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभाचा फोटो ही प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या या पिशव्यांमध्ये प्रवाशी थुंकत आहेत, कचरा टाकत आहेत, या मुळे राष्ट्रीय चिन्हाचा अवमान होत असल्याने प्रवाशी आणि आंबेडकरी जनतेने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भारताचे राष्ट्रीय चिन्ह कचरा कुंडी मधील प्लास्टिक पिशव्यांवर चापून घेणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना राष्ट्र चिन्हाचा अवमान होत असल्याचे याचे भान राहिलेले नाही. राष्ट्र चिन्हाचा अवमान करणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या बेजाबदार अधिकाऱ्यांवर राष्ट्र चिन्हाचा अवमान केल्या प्रकरणी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी रेल्वे प्रवाशी व आंबेडकरी जनतेकडून केली जात आहे.

