भांडूप रेल्वे स्थानक आणि परिसराचा लवकरच कायापालट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भांडूप रेल्वे स्थानक आणि परिसराचा लवकरच कायापालट

Share This
मुंबई - ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमैया यांनी आज ( 13 फेब्रुवारी,2015) भांडूप रेल्वे स्थानक आणि परिसराची पाहणी केली आणि नागरिकांच्या समस्यांचा वेध घेतला. यावेळी त्यांनी एमएमआरडीए महानगरपालिकामध्यरेल्वेबेस्ट आणि ट्रॅफिक पोलीस या सर्वच अधिका-यांशी चर्चा करुन भांडूप रेल्वे स्थानक आणि परिसराच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा केली.

भांडूप रेल्वे स्थानकात येण्यासाठी प्रवाशांना सध्या एक मार्गिका उपलब्ध आहेत्यातच फेरिवाले आणि बाहेर बेस्टचा स्टॉप असल्याने संध्याकाळी आणि सकाळच्या वेळी प्रवाशांना अडचणी येतात. प्रवाशांच्या सोयीसाठी भांडूप प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील रेल्वेपूलाचे नुतनीकरण कऱण्यात येणार असून हा पूल बाहेरील स्कायवॉकला जोडण्यात येणार आहे. तसेच कोकणात जाणा-या चाकरमन्यांसाठी सकाळच्यावेळी एकच तिकिट खिडकी सुरु असते त्याऐवजी आता अजून एक तिकिटखिडकी सुरु कऱण्यात येणार आहे. अतिरिक्त स्वच्छतागृहाची सुविधाही कऱण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त प्रवाशांच्या सुविधेसाठी भांडूप रेल्वे स्थानकात येण्यासाठी लवकरच मुंबईच्या दिशेने दुसरे प्रवेशद्वार सुरु कऱण्यात येणार असूनयेत्या दस-यापर्यंत या सर्व कामांचा शुभारंभ करण्यात येईल असे आश्वासन किरीट सोमैया यांनी दिले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages