मुंबई - 1 मे या महाराष्ट्र दिनापासून पोलिस बँन्डची धून मुंबईमध्ये तसेच राज्यामध्ये दर रविवारी साधरणत: एक तास सुरु करण्याचा आमचा विचार आहे. मुंबईसह राज्यामध्ये निवडक ठिकाणी व्हिडीओ वॉलची निर्मिती करुन त्यामध्ये परमवीरचक्र विजेते ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर व संयुक्त महाराष्ट्र चळवळ असे महाराष्ट्राचे गौरवाचे क्षण चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात येतील अशी माहिती सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
देशातील बारा ज्येष्ठ संगीतकारांनी सूरसाद दिलेल्या राष्ट्रगीताचा लोकार्पण सोहळा आज (10 feb. 2015 ) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थित झाला. राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रगीत हे फक्त 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी या दिवशीच मर्यादीत न राहता हे दरदिवशी जागृत राहीले पाहीजे, प्रत्येक भारतीयांच्या मनात दैनंदीन जीवनात राष्ट्रभक्ती जागविली गेली पाहीजे असे विचार तावडे यांनी मांडले. आज लोकार्पण करण्यात आलेल्या राष्ट्रगीतांना शब्दाची गरज नाही. तर ज्या ज्येष्ठ संगीतकारांनी हे सूरसाद करुन बनविले आहे, त्यामध्ये राष्ट्रभक्तीच उमटली आहे. असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. राष्ट्रगीताची निर्मिती करणारे अभिनेते पुष्कर श्रोत्री व अमेय खोपकर यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.
