मुंबई । प्रतिनिधी - केंद्र सरकारचा शेतकरी विरोधी भुसंपादन वटहुकुम रद्द करा व् राजापुर तालुक्यातील कजिर्डा येथील 20 वर्षे रखड्लेले जामदा धरण रद्द करा या मागणी साठी धर्मराज्य शेतकरी संघटने द्वारे मंगलवारी मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आन्दोलन करण्यात आले.
मोदी यांच्या नेतृत्वा खाली केंद्र सरकारने 2013 च्या भुसंपादन कायद्यात दुरुस्तीच्या नावाखाली 2014 मधे भुसंपादनाबाबत वटहुकुम काढण्यात आला आहे. हा वटहुकुम शेतकरी विरोधी असल्याने वटहुकुम त्वरित रद्द करावा. तसेच राजापुर तालुक्यात गेली 20 वर्षे जामदा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम रखडले आहे. यामुले हा प्रकल्प रद्द करावा या मागण्याबाबतचे निवेदन जल संपादन मंत्री गिरीष महाजन याना देण्यात आले.
