मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ९ मार्चपासून मुंबईत सुरू होत असून त्यात १८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याच्या इतिहासात सर्वात कमी कालावधीचे म्हणजेच तीन आठवड्यांचे हे अधिवेशन असण्याची शक्यता असून त्याचा कालावधी वाढवायचा की नाही यावर येत्या २६ फेब्रुवारीला चर्चा होणार असल्याचे कळते.
मंगळवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत तीन आठवड्यांच्या कामकाजाला मंजुरी देण्यात आली, तर अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्यांचे घ्यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या बैठकीत केली. या बैठकीत १८ दिवसांचे कामकाज ठरविण्यात आले, परंतु यात केवळ तीन आठवड्यांचे कामकाज ठरविले गेले. यावर विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्याने अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यासंदर्भात येत्या २६ फेब्रुवारीला पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ९ मार्चला संयुक्त सभागृहापुढे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे अभिभाषण होईल. त्यानंतर शोकप्रस्ताव मांडला जाईल. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, शिवसेनेचे बाळा सावंत, मुखेडचे दिवंगत भाजपा सदस्य गोविंद राठोड यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. दिवंगत कॅाम्रेड गोविंद पानसरे यांनाही आदरांजली वाहण्यात यावी, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली. मात्र ते विधानसभा वा विधान परिषदेचे सदस्य नसल्याने त्याबाबत नंतर निर्णय घेण्याचे या बैठकीत ठरले. याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे, शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या निधनानंतर विधिमंडळात शोकप्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यामुळे कॉ. पानसरे यांच्या निधनाबद्दलही शोकप्रस्ताव मांडला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.