मुंबई (प्रतिनिधी) - दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षाकाळात तत्काळ मदत, मार्गदर्शन आणि समुपदेशनासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाने ०२२-२७८८१०७५ आणि २७८९३७५६ ही हेल्पलाइन सुरू केली आहे. ती २६ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
सकाळी ८ वाजल्यापासून ही हेल्पलाइन कार्यान्वित होणार असून रोज रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहील. परीक्षा जवळ आली की विद्यार्थी मानसिक दडपणाखाली असतात. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी पालकांना मदतीची गरज असते. त्याचप्रमाणे परीक्षेपूर्वी आणि परीक्षाकाळात विद्यार्थी व पालकांना काही शंका, समस्या उद्भवल्यास तातडीने त्याचे निरसन होणे आवश्यक असते.. या हेल्पलाइनवर समुपदेशकांचेही मार्गदर्शन मिळू शकेल.