एसटीचा सोमवारपासून स्वच्छता पंधरवडा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एसटीचा सोमवारपासून स्वच्छता पंधरवडा

Share This
मुंबई - एसटीची आगारे आणि बसस्थानकांमध्ये येत्या सोमवारपासून (ता. 16) स्वच्छता पंधरवडा मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. त्यात त्यांची रंगरंगोटीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


एसटीची काही आगारे तोट्यात आहेत; परंतु सामाजिक जबाबदारी म्हणून ती चालवली जातील. मुक्कामाच्या गाडीवरील चालक आणि वाहकासाठी शेड बांधण्याचा विचार आहे. "शिवनेरी‘च्या गाड्यांचे कंत्राट संपल्यावर एसटी नवीन गाड्या खरेदी करील, असे सांगताना एसटीला टोलमाफी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली; मात्र त्यासाठी किती वेळ लागेल ते सांगण्याचे टाळले. खासगी प्रवासी वाहतूकदारांबरोबर स्पर्धा करण्यासाठी सेवेचा दर्जा व सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छतेसाठी बसमध्ये कचऱ्याची पिशवी ठेवण्याचा विचार आहे. एसटी कॅंटिनमधील खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यावर भर दिला जाईल. एसटीच्या या स्वच्छता मोहिमेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सहभागी होतील, असेही रावते यांनी या वेळी स्पष्ट केले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages