स्वाईन फ्ल्यूचे आणखी १९ रुग्ण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्वाईन फ्ल्यूचे आणखी १९ रुग्ण

Share This
मुंबई : गेल्या वर्षी डेंग्यूने मुंबईत कहर केला असल्याने पालिकेचा आरोग्य विभाग 'कामाला' लागला असताना या वर्षी स्वाईन फ्ल्यूमुळे आरोग्य विभागाची तारांबळ उडाली आहे. शुक्रवारी मुंबईत स्वाईन फ्ल्यूचे १९ रुग्ण आढळले असून, १६ रुग्ण मुंबईतील व तीन जण मुंबईबाहेरील आहेत. यापैकी १५ जणांची प्रकृती स्थिर, एक रुग्ण व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला आहे. मुंबईतील १६ रुग्णांमध्ये गोरेगाव येथील २ वर्षांची बालिका आणि मुलुंड, मुंबई सेंट्रल आणि वरळी येथील पाच वर्षांच्या बालकांचा समावेश आहे. १६ रुग्णांमध्ये नऊ पुरुष आणि सात महिला रुग्णांचा समावेश आहे. 

४६ वर्षीय पुरुष आणि ५१ वर्षीय पुरुष रुग्ण अनुक्रमे उल्हासनगर आणि ठाण्यातील असून खाजगी रुग्णालयात दाखल असलेला उल्हासनगरचा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे, तर कामोठे येथील ५४ वर्षांची महिला रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

१६ रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यात वांद्रे येथील २७ वर्षीय महिला, अंधेरी (पूर्व) येथील ४0 वर्षीय पुरुष, माहीम पश्‍चिम येथील ५१ वर्षांचा पुरुष, मालाड पश्‍चिम येथील ४९ वर्षांचा पुरुष, ग्रँट रोड येथील ३३ वर्षांची महिला, भांडुप पूर्व येथील २२ वर्षांची महिला, घाटकोपर येथील २५ वर्षांची महिला, अंधेरी पश्‍चिम येथील २७ वर्षांची महिला, महालक्ष्मी येथील ३0 वर्षीय महिला, वरळी येथील ३८ वर्षांंचा पुरुष, विलेपार्ले येथील ६५ वर्षीय महिला आणि खार पश्‍चिम येथील ३0 वर्षांच्या महिलेचा रुग्णांत समावेश आहे, असे आरोग्य विभागातून सांगण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages