फ्रिडम फ्रॉम डायबेटीस उपक्रम मुंबईत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

फ्रिडम फ्रॉम डायबेटीस उपक्रम मुंबईत

Share This
मुंबई : संपूर्ण भारतासह जगातील मधुमेहींना इन्सुलीनपासून मुक्ती मिळावी, यासाठी फ्रिडम फ्रॉम डायबेटीस या चळवळीला पुण्यात सुरुवात झाली असून ७ ते ८ मार्च दरम्यान मुंबईत हे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. प्रमोद त्रिपाठी यांनी दिली आहे. या उपक्रमाचे संस्थापक डॉ. प्रमोद त्रिपाठी यांनी मधुमेह क्रांतिकारक चळवळ असल्याचे सांगत २ वर्षांत २00 पेक्षा जास्त रुग्णांचे इन्सुलीन, तर ८00 पेक्षा जास्त रुग्णांचे औषध घेणे बंद केल्याचे या वेळेस सांगितले. 

मधुमेहापासून मुक्ती मिळावी, हा यामागील उद्देश असून २0१४ पर्यंत १ हजार रुग्णांना याचा फायदा झाला आहे. २0१६ पर्यंत हे प्रमाण वाढून १ लाखापर्यंत करण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे. हे शिबीर ७ मार्च रोजी सेंट अँण्ड्रू ऑडिटोरिअम, वांद्रे व ८ मार्च रोजी मराठी साहित्य संस्कृती कला हॉल, वाशी, नवी मुंबई येथे पार पडणार आहे. या शिबिरासाठी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.फ्रिडमफ्रॉमडायबेटीस.ऑर्ग / रजिस्टर येथे नोंदणी करावी किंवा 0२0- ६0५0४0१२/ १३ येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages