कुलगुरु वेळुकरांची उचलबांगडी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कुलगुरु वेळुकरांची उचलबांगडी

Share This
प्र - कुलगुरु नरेश चंद्रा यांना कुलगुरु पदाचा पदभार सांभाळण्याचे आदेश
मुंबई / प्रतिनिधी 
मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त वादग्रस्त कुलगुरु म्हणुन ओळख असणाऽया डॉ. राजन वेळुकर यांना अखेर राज्यपाल सी. विद्यासागर यांनी कुलगुरु पदापासुन दुरु राहण्याचे आदेश देत त्यांच्यासाठी मुंबई विद्यापीठाचे दार कायमचे बंद करण्यात आले आहे. राज्यपाल यांच्या आदेशानंतर डॉ.राजन वेळुकर कुलगुरु पदासाठी अपात्र असल्याचे स्पष्ट जाले आहे. कुलगुरु पदाचा तात्पुरता पदभार प्र-कुलगुरु नरेश चंद्रा यांनी सांभाळावे असे आदेश राज्यपाल यांनी दिले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न घडलेली घटना राज्यपाल सी. विद्यासागर यांच्या कायर्कालामध्ये घडली. एखाद्या कुलगुरुनां तुम्ही पदापासुन दुर व्हा असे आदेश एक प्रकारे हक्कालपट्टी करण्यात आले आहे. 

वादानेच आपल्या कायर्काळाची सुरुवात करणारे राजन वेळुकर यांची विद्यापीठातुन एक्जीटदेखील वादानेच जाली आहे. कोणत्याही देशाच्या किंवा राज्याच्या इतिहासामध्ये न घडणारे काम मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी असलेल्या निवड समितीने करुन दाखवले होते. या आपल्या देशात कोणतीही गोष्ट अशक्य नाही असे सांगणाऽया वेळुकर यांनी आपल्या शब्दाचा मान राखत कोणत्याही प्रकारची पात्रता नसतांनाही मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु जाले. 

कुलगुरु पदासाठी व्यक्तीची शैक्षणिक पात्रता, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध जालेले शोधनिबंध, शिक्षक म्हणून त्याची पात्रता या सर्व बाबी विचारात घेतल्यानंतर नियुक्ती करण्यात येत मात्र याठिकाणी काही वेगळेच घडले. कुलगुरू पदासाठी आवश्यक पात्रता नसतानाही डॉ. वेळूकर यांनंी आपल्या राजकीय वजनाचा वापर करुन ७ जुलै २॰१॰ रोजी कुलगुरु पदावर विराजमान जाले. राजन वेळुकर कुलगुरु पदासाठी अपात्र असल्याचे सांगत ए. डी. सावंत यांनी २॰११ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याचप्रमाणे माजी राज्यपाल के.शकंरनारायणन आणि राज्यपाल सी. विद्यासागर यांना वेळुकर कुलगुरु पदासाठी अपात्र असल्याचे सांगत अनेकवेळा पत्रव्यवहार केले. वेळकर यांचा कायर्काल संपण्यासाठी दोन महिण्याचा कालावधी असतांना वेळुकर कुलगुरुपदासाठी पात्र नसल्याचे निष्कर्ष नोंदवीला होता.याचप्रमाणे निवड समितीकडुन चुकीच्या पध्दतीने वेळुकारांची निवड जाले असल्याचे सांगत ताशेरे ओढले होते या सर्व प्रकरणांची दखल घेत राजन वेळुकर कुलगुरु पदासाठी अपात्र असल्याचे सांगत त्यांनी आपल्या पदापासुन दुर रहावे असे स्पष्ट आदेश राज्यपाल सी विद्यासागर यांनी दिले आहे. सोप्या भाषेत सागांयचे असेल तर वेळुकरांची हक्कालपट्टी जाल्यानंतर त्या पदाचा कारभार मुंबई विद्यापिठाचे प्र-कुलगुरु नरेश चंद्र यांनी पुढील आदेश येईपर्यंत साभांळावे असे आदेश राज्यपाल यांनी दिले आहे.

काय आहे प्रकरण ?राजकीय वजन आणि खोटी माहिती देऊन कुलगुरुपद पदरात पाडले
अध्यपनाचा काळ अपुर्ण, संशोधन होणे आवश्यक
शोधनिबंधांची कुठेच नोंद नाही
नियमात बसत नसतांनाही शोध समितीकडुन वेळुकरांची निवड
शोध समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
राज्यपालांच्या वेळुकरांना पदापासुन दुर राहण्याच्या आदेशांने शोध समितीच्या सदस्यांनी गैर कारभार केल्याचे स्पष्ट जाले आहे. डॉ. ए. एस. कोळसकर, प्रा. पी. बलराम आणि जे. एस. सहारिया हे या समितीमध्ये होते. भारताच्या प्रसिध्द आणि चांगले शास्त्रज्ञ म्हणुन ओळख असणाऽया पी. बलराम यांची ओळख आहे.

मुंबई विद्यापिठाचे अतोनांत नुकसान: ए.डी.सावंत गेल्या चार वर्षामध्ये मुंबइ विद्यापीठामध्ये चुकीच्या पध्दतीने अनेक करर्मचारी आणि अधिकाऽयांची राजन वेळुकर यांनी नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे चुकीच्या धोरणामुळे विद्यापीठाचे खुप नुकसान जाले आहे. अखेर सत्याचा विजय जाले असल्याचे वेळुकरां विरोधात रान पेटविणाऽया ए.डी.सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपलांनी शैक्षणिकदृष्टया घेतलेला निर्णय: शिक्षणमंत्री तावडेराज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांना पदावरून दूर होण्याचे दिलेले आदेश हा राज्यपलांनी शैक्षणिकदृष्टया घेतलेला निर्णय असल्यांची प्रतिक्रिया राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages