मुंबईत टीबीचे रोज तीन बळी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत टीबीचे रोज तीन बळी

Share This
मुंबई - एमडीआर तसेच एक्सडीआर या औषधांना प्रतिसाद न देणार्‍या क्षय रोगामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत दररोज ३ जणांचा क्षयरोगाने मृत्यू होत असल्याची गंभीर बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. ११ वर्षांत एकूण १२४३० नागरिकांचा क्षयरोगाने मृत्यू झाल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीत स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका प्रशासनाकडे ११ वर्षांतील क्षय रुग्णांची माहिती मागितली होती. क्षयरोग नियंत्रण विभागाच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार २००४ ते २०१४ या ११ वर्षांत एकूण क्षय रुग्णांची संख्या ३ लाख ३६ हजार १२२ आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages